पेडणे (प्रतिनिधी)
राजकारणात सक्रिय असतानाही एका हाडामासाचा कलाकार असलेले, कला संस्कृतीचे जतन करत असतानाच राजकारण व समाजकारण याला एका धाग्यात बांधून नाट्या परंपरा, नाट्या संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी नाट्या क्षेत्रातही तेवढेच योगदान देणारे कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, हळर्ण येथील ऐतिहासिक किल्ल्यावर खास रंगमंच उभारून सादर केली आणि वाहवा मिळवली.
हळर्ण येथील नटेश्वर कला आणि सांस्कृतिक मंडळ यांनी निर्मित केलेल्या आणि सिद्धीनंदन थिएटर प्रस्तुत ऐतिहासिक नाटक ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाचा प्रयोग हळर्ण येथील ऐतिहासिक किल्यावर सादर करण्यात आला. या नाट्याप्रयोगाच्या सुऊवातीला मंडळाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर, जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, हलर्ण सरपंच दिव्या नाईक, कासारवर्णे सरपंच नवनाथ नाईक, चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गवस, पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. उदय कुडाळकर, डॉ. देसाई, आमदार जीत आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर, जिल्हा पंचायतसदस्य सीमा खडपे, चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गवस यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.