ऑनलाईन टीम / मुंबई :
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. मुंडे यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
मुंडे यांनी ट्विटमध्ये फेसबुक पेज शेअर करत म्हटले आहे की, मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन ऍडमीन किंवा मॉडेरेटर म्हणून कुठलिही एक्टीव्हीटी करू शकत नाही. तरी, फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे ऍडमीनचे अधिकार देऊन पेज सुरू करावे. पेज हॅक झाल्याबद्दल आपण महाराष्ट्र सायबर विभागाकडे रीतसर तक्रारही नोंदवल्याचे त्यांनी सांगितलं.