प्रतिनिधी /मडगाव
बाळ्ळी रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर ‘मच्छगंधा एक्सप्रेस’ रेल्वेची धडक बसून एक अज्ञात युवक ठार झाला. ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावच्या दिशेने जात असलेल्या वरील रेल्वेची धडक बसून एक युवक जखमी झाल्याची माहिती या रेल्वेच्या एका कर्मचाऱयाने कोकण रेल्वे पोलिसांना दिली. त्यावरुन पोलीस घटनास्थळी गेले. पाहतो तो तेथे एक मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटविण्याच्या हेतूने शवागृहात ठेवला आहे.