बेळगाव ः
मजगावातील शेतवडीतील रस्त्याचे खडीकरण करून देण्याचे अखेर मान्य करण्यात आले. त्यामुळे शेतकऱयांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे दुपदरीकरणासाठी शेतवडीतील रस्ता संपूर्ण खराब झाल्याने खड्डेमय बनला आहे. त्यासाठी ‘दै. तरुण भारत’मधून आवाज उठवून निदर्शनास आणताच संबंधित रेल्वे कॉन्ट्रक्टर विकास रेड्डी यांनी आपल्या प्रतिनिधीला पाठवून देऊन सदर रस्ता त्वरित दुरुस्ती करून खडीकरण करून देण्यात येईल व लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.