प्रतिनिधी / फोंडा
मडकई येथील श्री नवदुर्गा मंदिरात नवमी पालखी उत्सव रविवार 18 रोजी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाचे यजमानपद मनोज म्हार्दोळकर व कुटूंबिय करणार आहे.
उत्सवानिमित्त सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाआरत्या, महानैवेद्य, सायंकाळी 6.30 वा. ‘स्वरसिद्धी’ हा सांगितीक कार्यक्रम होणार आहे. यात गायिका सिद्धी सुर्लकर पिळगांवकर, रामकृष्ण सुर्लकर (हार्मोनियम), संकेत खलप (तबला) व राहूल खांडोळकर (मंजिरी) हे कलाकार भाग घेणार आहे. रात्री 8.30 वा. आरती व पालखी मिरवणूक, प्रसाद वितरण व त्यानंतर अन्नसंतर्पण होणार आहे. या उत्सवाला भाविकांनी उपस्थिती लावावी असे यजमान मनोज म्हार्दोळकर यांनी कळविले आहे.