कोविडच्या फैलावामुळे स्वेच्छा लॉकडाऊनचा व्यापाऱयांचा निर्णय : ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी दिलेली माहिती
प्रतिनिधी / मडगाव
कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन दक्षिण गोव्यातील आणि खास करून सासष्टीची मुख्य बाजारपेठ असलेले न्यू मार्केट आज सोमवार 20 पासून रविवार 26 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱयांनी घेतला आहे. न्यू मार्केटमधील टेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी व्हिडीओद्वारे जारी केलेल्या संदेशातून ही माहिती दिली आहे. राजेंद्र आजगावकर, गोपाळ नाईक, विराज आमोणकर, सुभाष मसूरकर व अन्य व्यापाऱयांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सुभाष आमोणकर व समितीच्या अन्य सदस्यांना तसेच इतर व्यापाऱयांना विश्वासात घेण्यात आले असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले.कोविडचे रुग्ण अलीकडे वाढत असून सासष्टीत कोविडचे रुग्ण वाढले आहेत मार्केटबाहेरच्या परिसरात एक-दोन घटना नजरेस आल्या असून त्यात रॉयल फूडनजीक मृतावस्थेत आढळलेला भिकारी नंतर कोविड पॉझिटिव्ह आढळला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. न्यू मार्केटच्या परिसरात कित्येक भिकारी व अन्य बेघर परप्रांतीय फिरताना आढळतात. या पार्श्वभूमीवर कोणताही धोका पत्करणे योग्य ठरणार नाही हेही स्वेच्छेने बाजारपेठ बंद ठेवण्यामागील एक कारण असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले.
न्यू मार्केटमध्ये गुरुवारी तीन दिवशीय लॉकडाऊनच्या आधी खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. पण आम्ही ग्राहकांवर सक्ती करून त्यांचा संताप ओढवून घेऊ शकत नव्हतो, असे शिरोडकर म्हणाले. आम्हा व्यापाऱयांच्या घरी लहान मुले तसेच वृद्ध व्यक्ती असल्याने त्यांची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मार्केटबाहेरील व्यापाऱयांनीही सहकार्य करावे
तीन दिवशीय लॉकडाऊमुळे कोरोनाची साखळी तोडणे शक्मय नसून त्यामुळे आम्ही व्यापाऱयांनी खबरदारी म्हणून स्वेच्छेने आणखी आठवडाभर बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटबाहेरील व्यापाऱयांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकांनी खरेदीसाठी जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांवर गर्दी करणे टाळावे, असे आवाहन शिरोडकर यांनी केले. यावेळी व्यापारी तसेच मडगाव पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष धनंजय उर्फ दादी मयेकर उपस्थित होते.
आठवडा वा पंधरवडाभर लॉकडाऊनची गरज
चतुर्थी नजीक पोहोचली असल्याने लोक खरेदीसाठी गर्दी करणार याची जाणीव ठेवून सरकारने चतुर्थीपूर्वी आठवडाभर वा पंधरवडाभर लॉकडाऊन करून कोविडची साखळी तोडण्याची आवश्यकता शिरोडकर यांनी व्यक्त केली.
आठवडाभर बाजारपेठ बंद : दुसऱया संघटनेची माहिती
न्यू मार्केटमध्ये दोन संघटना कार्यरत असून देविदास बोरकर यांच्या अध्यक्षतेखालील व्यापारी संघटनेने आठवडाभर न्यू मार्केट बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सर्व व्यापाऱयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. सभोवतालील दुकानदारांनीही या स्वेच्छा लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हावे. तसेच मडगाव पालिकेने संपूर्ण पालिका क्षेत्रात लॉकडाऊन लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तरच कोविडवर मात करणे शक्मय होईल, असे बोरकर यांनी सांगितले.