प्रतिनिधी /मडगाव
आंतरराष्ट्रीय महिला दिनी दि. 5 मार्च रोजी, मडगाव गोवा येथील रोशना वेर्णेकर यांना न्यूयॉर्क मध्ये मिस युनिव्हर्स 2021 हरनाझ संधू यांच्याकडून त्यांच्या परोपकार, प्रशिक्षण आणि महिला सक्षमीकरण कार्यासाठी प्रेरणादायी महिला पुरस्कार मिळाला.
रोशना वेर्णेकर वेर्णेकर यांनी महिलांना त्यांची योग्यता ओळखण्यासाठी आणि त्यांना मूर्त रूप देण्यासाठी व स्वतःचा चांगला विकास घडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे.
त्या एचडीईएफ येथे महिला सक्षमीकरण आणि समाजकल्याण (अमेरिका) च्या मिस भारत ओहायोच्या राज्य संचालक आणि प्रवक्त्या आणि टोस्टमास्टर इंटरनॅशनलच्या सदस्यत्वाच्या महत्वाच्या सदस्य आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्या इतर स्वयंसेवी आणि देणगी कार्यात सक्रियपणे सहभागी होत आहे.
रोशना वेर्णेकर या प्रमोद आणि पुष्पा पावसकर यांच्या कन्या आणि फातोर्डा-मडगाव येथील डॉ. प्रेमानंद आणि ज्योती वेर्णेकर यांच्या स्नुषा आहेत.