प्रतिनिधी /मडगाव
गोव्याचे सुपुत्र स्व.पं.आबाजी पणशीकर यांनी 1981 साली केंकरे कॉलनी खारेबांध सारवाडा येथे स्थापन केलेल्या साई मंदिरात दसरा शुभदिनी साईबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी गोमंतकातील साई प्रचारक पू. शाहूमहाराज यांच्या हस्ते हरीमंदिराचे मनोहर बोरकर, समाजसेवक गोकुळदास शिरोडकर, नाटय़लेखक प्रसाद सावंत, जुवारीचे गोविंद लोटलीकर, वल्लभ रायकर, तलाठी कल्पेश देऊळकर, कॅनरा बँकेचे राजू रेडकर, तबलावादक दामोदर, कलासागरचे दिपक, दुकानदार अशोक कासार, उदय देसाई, वासुदेव चारी, मोहन नाईक, भैय्या आमोणकर, हरीश चारी, अशोक भोबे, समीर हेदे, श्रवण दुभाषी, नारायण दास वेलिंगकर, लाडू सीमेपुरुषकर, सौ.जया शाहूराव, सौ.डॉ. भूषण, सौ.शामला, शिक्षिका सौ.मीराश्री, कार्यकर्त्या सौ. वविता रायकर, सौ. रामेश्वरी मोरअ?, सौ.अभिलाषा, पत्रकार सौ.अनुया, सौ.सीमा नि.देसाई, सौ.किशोरी रेडकर, श्रीमती मिलन बोरकर, शोभा साळकर आदी भक्त मान्यवरांना साईबाबांच्या आशीर्वादाचे श्रीफळ प्रसाद देण्यात आला. नंतर आरती राष्ट्रहित व गोव्याच्या भलायकी करिता सांगणे करून तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .