प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेने शनिवारी बेकायदा फळ तसेच मासळीविपेते आणि बेकायदा झोपडीवजा गाळे उभारून वास्तव्य करणारे परप्रांतीय यांच्या विरोधात मोहीम राबवून कारवाई केली. मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी या कारवाईसाठी पुढाकार घेतला. प्रत्यक्ष उपस्थित राहून कारवाई पथकाकडून त्यांनी कारवाई करून घेतली. पालिकेकडे सदर अतिक्रमणांसंदर्भात अलीकडे कित्येक तक्रारी आल्याने सदर कारवाई मोहीम राबविण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष पेरेरा यांनी दिली.
रवींद्र भवन व सभोवतील जागेचे सुशोभिकरण करून येथे प्रशस्त पदपथ उभारण्यात आले आहेत. याचा वापर लोक चालण्याच्या व्यायामासाठी वा विसावा घेण्यासाठी करत असतात. मात्र या ठिकाणी फळ व अन्य विपेते अतिक्रमण करत असल्याचे आढळून येत आहे. शनिवारी पदपथांच्या बाजूने मालवाहू रिक्षा उभी करून फळविक्री करणाऱया बेकायदा विपेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी पालिकेने काही फळे जप्त केल्याची माहिती नगराध्यक्ष पेरेरा यांनी दिली.
बेकायदा मासेविक्रेत्यांवर कारवाई
माडेल घाऊक मासळी मार्केटबाहेर बेकायदा बसून कित्येक जण किरकोळ मासळीविक्री करत असतात. एसजीपीडीए मार्केटमधील किरकोळ मासळीविपेत्यांकडून या बेकायदा मासळी विपेत्यांवर कारवाईची मागणी वेळोवेळी उचलून धरण्यात येत असते. कित्येक वेळा कारवाई केली, तरी पुन्हा पुन्हा येथे हा बेकायदा मासळी बाजार भरत असतो. शनिवारी पालिकेने या बेकायदा मासळीविपेत्यांना हिसकावून लावले व पुन्हा दिसल्यास मासळी जप्त करण्याचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, जुना बाजार येथे प्लास्टिक ऑफ पॅरीसच्या मूर्ती तयार करून विकणारे तसेच अन्य बेकायदा व्यवसाय करणारे परप्रांतीय जवळच्या खुल्या जागेत अतिक्रमण करत असतात. कित्येक वेळा कारवाई करूनही ते पुन्हा पुन्हा झोपडीवजा गाळे उभारून वास्तव्य करत असतात व सर्व विधी उघडय़ावर करून परिसर गलिच्छ करत असतात. त्यांनी येथे पुन्हा बस्तान मांडल्याने स्थानिक नगरसेवक फ्रान्सिस जोनास यांनी नगराध्यक्षांच्या नजरेस ही बाब आणून दिली व नगराध्यक्षांसोबत उपस्थित राहून या बेकायदा वास्तव्य करून असलेल्यांना शनिवारी हाकलून लावले. पालिकेच्या या कारवाईचे समाजमाध्यमांवरून स्वागत होत असून सदर कारवाई सलग राबविण्यात यावी, अशी मागणी मडगाववासियांकडून होत आहे.