विनाकाम वेतन घेणाऱयांना शोधण्यासाठी उपाय
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेतील रोजंदारीवरील काही कामगारांना शनिवार, रविवार कामावर येत नसताना त्या दिवसांचे वेतन दिले जात असल्याच्या कैफियती अन्य रोजंदारीवरील कामगारांनी सोमवारी दुपारी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्यासमोर मांडल्य?ाने त्याचे पडसाद बुधवारी पार पडलेल्या पालिका मंडळ?ाच्या बैठकीत उमटले. काही नगरसेवकांनी यासंदर्भात मुख्याधिकारी फर्नांडिस यांना जाब विचारला असता आज शनिवारी सकाळी सर्व रोजंदारीवरील तसेच कंत्र?ाटी पद्धतीवर काम करणाऱया कामगारांची परेड घेऊन यासंदर्भात खातरजमा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी हजेरीची नोंद ठेवणारे संबंधित पर्यवेक्षक व अधिकाऱयांना विश्वासात घेऊन आवश्यक कृती करण्याचे आश्वासन दिल्याचे कैफियत मांडलेल्या रोजंदारीवरील काही कामगारांनी स्पष्ट केले होते. नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी बुधवारच्या बैठकीत सदर विषय उपस्थित केला व मुख्याधिकाऱयांकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले असता आज शनिवारी कामगारांची परेड घेण्याचे ठरविण्यात आले. आरोप करणाऱया कामगारांनी काम न करता वेतन घेणाऱयांची ओळख यावेळी पटवून द्यावी, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले आहे. या परेडच्या वेळी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा तसेच उपनगराध्यक्षा दिपाली सावळ उपस्थित राहणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
पालिकेच्या कार्यालयात तसेच फिल्डवर काम करणाऱया मोजक्मया रोजंदारीवरील कामगारांवर विनाकाम वेतन देऊन सदर मेहेरनजर दाखविण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सेनिटरी विभागाकडून तर कामावर गैरहजर राहणाऱया दोन कामगारांच्या नावावर पगार काढण्याचे प्रकार सुरू असल्याचे या रोजंदारीवरील कामगारांनी मुख्याधिकाऱयांच्या नजरेस आणून दिले होते. यासंदर्भात सेनिटरी विभागाच्या वेतन काढण्यासाठी नियुक्त कर्मचाऱयाकडे विचारणा केली गेली असता पर्यवेक्षक कार्डवर जी हजेरी दाखवत असतात त्यानुसारच वेतन देण्यासाठी अहवाल तयार करण्यात येतो असे त्याने सांगितले होते. पाणी कुठे मुरते हे आता प्रशासनाने शोधून काढणे आवश्यक असून विनाकाम पैसे उकळण्यामागे रॅकेट असू शकते, अशी प्रतिक्रिया एका नगरसेवकाने व्यक्त केली होती.