वार्ताहर/ हिंडलगा
मानसिक अस्वस्थेतून एका महिलेने मार्कंडेय नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मण्णूर येथे घडली. द्रौपदा पांडू चौगुले (वय 62) रा. रेणुका गल्ली, मण्णूर असे तिचे नाव आहे.
याबाबत काकती पोलीस व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यापूर्वीच सदर महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. तेव्हापासून ती मानसिकरित्का अस्वस्थ बनली होती. रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास नाष्टा केल्यानंतर शेताकडे जाऊन येतो असे सांगून ती घराबाहेर पडली होती. त्यानंतर तीने मार्कंडेय नदीपात्रात नव्यानेच बांधण्यात आलेल्या बंधाऱयावरून उडी घेत आत्महत्या केली. सदर घटना आजुबाजुला असलेल्या शेतकऱयांनी पाहिली. पण बचावकार्य पोचेपर्यंत तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर घटनेची काकती पोलीस स्थानकात नोंद झाली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.