वार्ताहर / हिंडलगा
मण्णूर येथील मरगाईदेवी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका बैलगाडय़ाची चाके न बांधता बैलजोडीने गाडा पळविण्याच्या शर्यतीचे उद्घाटन शनिवारी झाले. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. सदस्य मधुकर चौगुले होते.
दीपप्रज्वलन सिव्हिल इंजिनिअर सागर कटगेण्णवर, ग्रा. पं. सदस्या सरिता नाईक, लता कडोलकर, जयश्री तोरे, लक्ष्मी सांबरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश पूजन भाजपा ग्रामीण माजी अध्यक्ष विनय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती प्रतिमा पूजन शिवाजी मंडोळकर, जोतिबा चौगुले, हनुमान प्रतिमेचे पूजन शंकर सांबरेकर, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन राजू जैन, सुजीत मंडोळकर आणि बापू सांबरेकर यांच्या हस्ते झाले. मरगाई देवीचे पूजन ग्रा. पं. सदस्य दत्तू चौगुले आणि रामा चौगुले यांनी केले. फज्जाचे पूजन प्रगतशील शेतकरी आण्णाप्पा कटगेण्णवर यांच्या हस्ते झाले. फज्जाचे उद्घाटन आर्किटेक्ट इंजिनिअर आर. एम. चौगुले यांच्या हस्ते फीत सोडून करण्यात आले. शर्यतीचे उद्घाटन उचगाव ब्लॉक काँग्रेसचे जयवंत बाळेकुंद्री आणि संजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एन. के. कालकुंद्री, ग्रा. पं. सदस्य नागेश चौगुले, जोतिबा शहापूरकर, वैभव कदम, उमेश चौगुले, राहुल मंडोळकर, नारायण शहापूरकर, सागर डोणकरी, मारुती मंडोळकर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तानाजी तरळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.