वार्ताहर/ हिंडलगा
मण्णूर येथील दिग्विजय ग्रुप क्लबतर्फे आयोजित मण्णूर प्रिमियर लिग (एमपीएल) 2020 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विठ्ठू माउली कन्स्ट्रक्शनचे संचालक शंकर एल. सांबरेकर यांनी केले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष सचिन चौगुले होते.
प्रारंभी निवृत्त जवान महादेव डोणकरी, युवराज काकतकर, संजय आनंदाचे लक्ष्मण कदम, शंकर चौगुले, मनोज चौगुले, यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन झाले. संघमालक मधुकर चौगुले, विष्णू चौगुले, संतोष केंचण्णावर, लक्ष्मण चौगुले, वैभव कदम, अनिल काकतकर, सागर डोणकरी, सुनील मंडोळकर यांच्या हस्ते राजमुद्रा पूजन केले. मशाल पूजन कॉन्ट्रक्टर गौरव चौगुले, मार्चिंग उद्घाटन अभियंते सचिन मंडोळकर, मशाल दौडचे स्वागत प्लंबिंग कॉन्ट्रक्टर भरमा आनंदाचे व यु मुम्बा कबड्डी संघातील खेळाडू सिद्धार्थ देसाई यांच्या हस्ते झाले. भाजप ग्रामीण माजी अध्यक्ष विनय कदम यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. अभियंते आर. एम. चौगुले, शंकर सांबरेकर, सागर करग्यान्नवर, ग्रा. पं. माजी उपाध्यक्ष सुधीर काकतकर, डॉ. भरत चौगुले, दत्तू चौगुले, आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. पुरस्कर्ते ओमकार चव्हाण, अभिषेक काकतकर, लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रतिमापूजन केले. एमपीएल 2020 बॅनरचे अनावरण संघ मालकांच्या हस्ते झाले. चषक व कॅप अनावरण सामाजिक कार्यकर्ते सुजीत मंडोळकर, शिवाजी कदम, राहुल मंडोळकर, स्कोर बुक अनावरण किरण चौगुले, भैरू चौगुले, स्कोर टॅब पूजन बबन चौगुले तर मैदानाचे पूजन अभियंते अरुण कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. पुरस्कर्ते शंकर एल. सांबरेकर यांनी यष्टिपूजन करून स्पर्धेचे उद्घाटन केले. सर्व खेळाडूंना संदीप कदम यांनी शपथविधी देवविली. उद्घाटनाच्या सामन्यात रॉयल किंग्स मण्णूर संघाने मण्णूर सुपर किंग्स संघावर पाच गडी राखून विजय मिळविला.
याप्रसंगी सिद्धार्थ देसाई, आर. एम. चौगुले, विनय कदम आदींनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व संघातील खेळाडू, ग्रा. पं. चे माजी सदस्य, दिग्विजय युथ क्लबचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन वैजनाथ चौगुले व वैभव कदम यांनी केले. नागेश चौगुले यांनी आभार मानले.
कबड्डीपटू सिद्धार्थ देसाईंची विशेष उपस्थिती
हुंदळेवाडी गावचे सुपुत्र व यु-मुम्बा कबड्डी संघातील उदयोन्मुख खेळाडू सिद्धार्थ देसाई यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात आपल्या यशाबद्दल माहिती देऊन खेळाडूंना सातत्य राखण्याबद्दल मार्गदर्शन केले.