योगचेही प्रशिक्षण मिळणार – एनआयओएसची योजना-नव्या अभ्यासक्रमाची निर्मिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अत्यंत लवकरच देशभरातील मदरशांमध्ये रामायण आणि भगवद्गीतेचे शिक्षण दिले जणार आहे. तसेच मदरशांमधील विद्यार्थी योगचेही प्रशिक्षण घेतील. नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ ओपन स्कुलिंग (एनआयओएस) प्राचीन भारतीय ज्ञान आणि परंपरेवरून 100 मदरशांमध्ये नवा अभ्यासक्रम सुरू करणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे. नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ ओपन स्कुलिंगचा हा नवा अभ्यासक्रम नव्या शिक्षण धोरणाचा हिस्सा आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे एनआयओएस मूलभूत अभ्यासक्रम सुरू करणार आहे. नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ ओपन स्कुलिंगने भारतीय ज्ञान परंपरेवरून 15 अभ्यासक्रम तयार केले असून यात वेद, योग, विज्ञान, संस्कृत भाषा, व्यावसायिक कौशल्य, रामायण, भगवद्गीता आणि पाणिनि-प्रवर्तित महेश्वरा सूत्र सामील आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी नोएडा येथील एनआयओएसच्या केंद्रय मुख्यालयात याची अध्ययनसामग्री सादर केली आहे. देश स्वतःच्या प्राचीन परंपरांना पुनर्जीवित करून ज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता होण्यासाठी सज्ज आहे. या अभ्यासक्रमांचे लाभ मदरसे तसेच जगातील भारतीय समाजापर्यंत पोहोचविणार असल्याचे पोखरियाल यांनी म्हटले आहे.
प्राथमिक, माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक स्तरावर मुक्त तसेच दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून अभ्यासक्रम संचालित करणाऱया दोन राष्ट्रीय मंडळांमध्ये एनआयओएसचा समावेश आहे. याच्या योग अभ्यासक्रमात पतंजलि कृतासूत्र, योगसूत्र व्यायाम, सूर्य नमस्कार, आसन, प्राणायाम, तणाव दूर करणार व्यायाम आणि स्मरणशक्ती वाढविणारा व्यायाम सामील आहे. व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीतील विविध कुशल पद्धतींना सामील करण्यात आले आहे.