ऑनलाईन टीम / श्योपूर :
मध्यप्रदेशातून चोरीचा एक असा मामला समोर आला आहे की, सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. मध्यप्रदेशातील श्योपूरमधील स्टेशन रोड स्थित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीतून 101 सोन्याचे पॅकेट गायब झाल्याची घटना समोर आली आहे.
बैंक अधिकाऱ्यांने या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, तिजोरीचे कुलूप जसेच्या तसे होते मात्र तिजोरीतील सोन्याचे 101 पॅकेट गायब झालेले होते. बँक अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असूून, या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केेेला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक सम्पत उपाध्याय यांनी सांगितले की, बँक अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, 9 जूनला जेव्हा आम्ही बँकेची तिजोरी उघडली, त्यावेळी तिजोरीतून गोल्ड लोन घेतलेल्या ग्राहकांचे 101 सोन्याचे पॅकेट गायब होते. पुढे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, जेव्हा आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाली त्यावेळी तिजोरीची मूळ चावी हरवली असल्याने डुप्लिकेट चावीनेे आम्ही तिजोरी उघडली.
पुढे उपाध्याय म्हणाले, या घटनेबाबत आम्ही बँक कर्मचार्यांची चौकशी करत आहोत. कारण या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तिजोरीत किती सोने होते, त्याची किंमत किती असेल या संदर्भात तपास सुरू आहे. लवकरच गुन्हेगारांना पकडण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.