ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशात विधानसभेच्या 28 जागांसाठी आज मतमोजणी सुरू असून, भाजपने एका जागेवर विजय मिळवला आहे. तर आतापर्यंतच्या मतमोजणीच्या कलांनुसार भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने 7 जागांवर आघाडी घेतली आहे. बसपा एका जागेवर पुढे आहे.
मध्यप्रदेशच्या 230 सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे 107 तर काँग्रेसचे 87, बसपा 2, सपा 1 आणि 4 अपक्ष आमदार आहेत. 115 हा बहुमताचा एकडा ठरू शकतो. भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी 8 जागा जिंकणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला 28 जागांची आवश्यकता आहे.
मात्र, आतापर्यंतच्या कलांचा आढावा घेता मध्यप्रदेशात भाजप सत्ता राखणार हे जवळपास आता स्पष्ट झाले आहे. सत्तेत पुन्हा विराजमान होऊ पाहणाऱ्या काँग्रेसच्या पदरी निराशाच येणार असल्याचे दिसून येते.