नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नैसर्गिक खते आणि इतर उत्पादने निर्माण करण्यासाठी मध्यप्रदेश सरकार गोवंशातील जनावरांचे तसेच म्हशींचे शेण खरेदी करण्याची योजना आखत आहे. शेणखत रासायनिक खतांपेक्षा जास्त उपयुक्त कसून त्यामुळे पिकाऊ भूमीचा कस वाढतो असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱयांचा कल सध्या शेणखत आणि तत्सम नैसर्गिक सामग्रीकडे आहे. म्हणून शेणखताचे उत्पादन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱयांना उपयुक्त ठरणाऱया जनावरांना रुग्णालयात नेण्यासाठी विशेष रुग्णवाहिका सेवेची प्रारंभही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती राज्य प्रशासनाने दिली आहे.