विनीयोग करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेमध्ये 25 लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या निधीचा विनीयोग करण्यासाठी रुपरेषा ठरविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर उपस्थित होते.
विविध वृत्तपत्रांचे संपादक, उपसंपादक आणि वार्ताहर यांनी आपले म्हणणे त्या ठिकाणी मांडले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सर्वांचे म्हणणे एकून घेतले. याबाबत पत्रकारांच्या कल्याणासाठी हा निधी वापरला जाईल. सर्वांना विश्वासात घेवूनच निधी खर्च केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. महापालिकेमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे पत्रकारांसाठी निधी राखीव ठेवण्यात आल्याबद्दल समस्त पत्रकारांनी अधिकाऱयांचे आभार मानले.