प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना टाळे ठोकण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. टिळकवाडी कला मंदिरशेजारी असलेल्या दवाखान्याला रविवारी टाळे असल्याने लस देण्यासाठी आलेल्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांची गैरसोय झाली. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला.
शहरात दरवर्षी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लस देण्याची मोहीम राबविण्यात येते. लसीकरण राबविण्यात येणाऱया महापालिकेच्या केंद्रांमध्ये किंवा महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आवश्यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने शहर आणि उपनगरात असलेल्या महापालिकेच्या 14 प्राथमिक आरोग्य केंद्रांना टाळे ठोकले आहेत. यापैकी काही मोजक्मयात केंद्रांमध्ये जिल्हा आरोग्य खात्याच्यावतीने नगर आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित प्राथमिक आरोग्य केंदे बंद आहेत. दरवर्षीप्रमाणे लसीकरण मोहीम राबविण्यासाठी स्थळ निश्चित करून आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण मनपाची प्राथमिक आरोग्य केंद्रे बंद असल्याने बंद आरोग्य केंद्राच्या दारात ताटकळत थांबण्याची वेळ कर्मचाऱयांवर आली. यामुळे रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविताना आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना आणि कर्मचाऱयांना गैरसोयींचा सामना करावा लागला. यामुळे महापालिकेच्या बेजबाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आरोग्य खात्याचे कर्मचारी नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी टिळकवाडी कला मंदिरशेजारी असलेल्या दवाखान्यात दाखल झाले. पण या ठिकाणी मनपाच्या दवाखान्याला टाळे असल्याचे लक्षात आल्याने एका दुकानाच्या पायरीवर बसण्याची वेळ आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांवर आली. या ठिकाणी कोणतीच सुविधा नसल्याने रस्त्यावर थांबून लहान मुलांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे माजी नगरसेवक किरण परब यांच्या नेतृत्वाखाली संतोष रोकडे, राजू वर्पे, रवि धनुचे किशोर गवळी, मोहन बेळगावकर आदींनी खुर्च्या, टेबलची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.