प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मनपाचे कामकाज ठप्प झाले होते. अधिकाऱयांसह कर्मचाऱयावर विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्याने नियमित कामकाज कोलमडले होते. पण गेल्या अडीच महिन्यापासून कोरोना डय़ुटीवर असलेले मनपाचे अधिकारी व कर्मचारी मनपा कार्यालयात रूजू झाले. त्यामुळे मनपाच्या नियमित कामास सोमवारपासून प्रारंभ झाले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे लॉकडाऊनच्या पाचव्या टप्यात काय होणार ? असा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र कर्नाटकात कोरोना विषाणूबाबत विशेष खबरदारी घेण्यात आली होती. तसेच लॉकडाऊनचे काटेकारेपणे पालन करण्यात आल्याने कोरोनाची लागण नियंत्रणात आली. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य खात्यासह मनपा कार्यालयाच्या अधिकाऱयांना जुपंण्यात आले होते. घरोघरी सर्व्हेक्षण करण्यासह परराज्यामधून येणाऱया नागरिकांना क्वॉरंटाईन करणे आदीसह निर्बधित क्षेत्रात सिलडाऊन करून सॅनिटायझर करणे, कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेवून त्यांना क्वॉरंटाइन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱयांवर आणि कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली होती. तसेच राज्याअंतर्गत आणि परराज्यामधील नागरिकांना घरी जाण्याची सुविधा उपलब्ध करणे, परराज्यातील नागरिकांना ठेवण्याची सुविधा करून जेवणाची सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी गेल्या अडीच महिन्यापासून याकामी व्यस्त होते. मात्र लॉकडाऊनज्या तिसऱया टप्यात 30 टक्के कर्मचाऱयांसह कार्यालये सुरू करण्याची मुभा देण्यात आली होती. शहरात लागण झालेली कोरोना विषाणूची साखळी संपु÷ात आल्याने चौथ्या टप्यात निर्बधित क्षेत्र वगळता विविध व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच सरकारी कामकाजास प्रारंभ झाला होता. पण मनपाचे कर्मचारी क्वॉरंटाइन करण्याच्या कामात व्यस्त असल्याने कार्यालयात येणे शक्मय नव्हते. पण परराज्यामधून येणाऱया नागरिकांना शहरात येण्यास बंदी घालण्यात आली असल्याने क्वॉरंटाईन होणाऱया नागरिकांची संख्या कमी झाली आहे. तसेच लॉकडाऊनच्या पाचव्या टप्यात काही मुभा देण्यात आली असून मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱयाची कोरोना डय़ूटीमधून मुक्तता झाली आहे. यामुळे सोमवार दि. 1 जून पासून मनपाचे आधिकारी व कर्मचारी कार्यालयात रूजू झाले असून नियमित कामकाजास प्रारंभ झाला आहे. काही अधिकाऱयावर कोरोनाबाबतच्या जबाबदाऱया अद्यापही असल्याने काही ठराविक वेळ कार्यालयात उपलब्ध रहात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.