प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणूकीसाठी मतदार प्रक्रियेकरिता बेळगाव आणि खानापुर तालुक्मयातील अधिकाऱयांची व शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खानापुरहून येणाऱया कर्मचाऱयांसाठी 23 बसची सोय करण्यात आली आहे. गुरूवार दि. 2 रोजी पहाटे 5 वाजता खानापुर तहसिलदार कार्यालयातसमोर सदर बस दाखल होणार आहेत. त्यामुळे खानापुर परिसरातील कर्मचाऱयांनी तहसिलदार कार्यालयासमोर उपस्थित रहावे असे आवाहन निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
मतदान प्रक्रियेसाठी बी.के.मॉडेल शाळेच्या आवारात निवडणूक सामग्री वितरीत करण्यात येणार आहे. त्याकरिता तसेच येथून मतदान केंद्रावर कर्मचाऱयांना सोडण्यात येणार आहे. दि. 3 रोजी मतदानानंतर बी.के.मॉडेल शाळेच्या आवारातून खानापुर तहसिलदार कार्यालयापर्यत कर्मचाऱयांना सोडण्यात येणार आहे. कर्मचाऱयांना ये-जा करण्यासाठी परिवहन मंडळाच्या 23 बसची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे खानापुर तालुक्मयातील कर्मचाऱयांनी तहसिलदार कार्यालयासमोर वेळेवर उपस्थित रहावे असे निवडणूक विभागाच्यावतीने पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.