माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना तसेच आरक्षणाविरोधात आता अनेक जण आक्षेप नोंदविताना दिसू लागले आहेत. वॉर्डमध्ये करण्यात आलेली फेरफार ही चुकीची आहे. त्यामुळे मतदानांबरोबरच निवडणूक लढविणाऱया उमेदवारांनाही त्याची समस्या होणार असून मनपाची वॉर्ड पुनर्रचना नव्याने करावी, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केली आहे.
नुकतीच त्यांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. सध्या करण्यात आलेली वॉर्ड पुनर्रचना ही भौगोलिक सलगता नसताना करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अनावश्यक प्रभाग वाढविण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी एका वॉर्डातील मतदार दुसऱया वॉर्डामध्ये तर दुसऱया वॉर्डातील मतदार इतर वॉर्डामध्ये अशी फेरफार करण्यात आली आहे. हे साफ चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सर्वांची मते जाणून पुनर्रचना करावी
बऱयाच वॉर्डप्रमाणे प्रभाग क्रमांक 1, 20 आणि 58 मध्ये कोणतीही भौगोलिकता नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा प्रकारे फेरफार करणे हे साऱयांनाच मारक असून कोणतीही पूर्व सुचना न देताना हा घोळ घालण्यात आला आहे. तेंव्हा याबाबत सर्वांची मते आजमावूनच पुनर्रचना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.