समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : विविध ठिकाणच्या क्यापारी संकुलांची घेतली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेला महसूल मिळवून देणाऱया व्यापारी संकुलातील समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. येथील समस्यांचे निवारण करून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी मागील कित्येक वर्षापासून महापालिकेकडे करण्यात येत आहे. तसेच काही गाळय़ातील भाडेकरूंच्या कराराची मुदत संपली असल्याने महापालिका आयुक्तांनी व्यापारी संकुलांची पाहणी करून माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे संकुलातील समस्यांचे निवारण होणार का? असा म्द्दा उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आणि ठिकठिकाणी व्यापारी संकुले आहेत. 440 गाळे असून सर्व गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. सदर व्यापारी संकुलातील भाडे वसुलीची जबाबदारी नंदू बांदिवडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडे मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने आता व्यापारी गाळय़ातील भाडय़ाच्या वसुलीची जबाबदारी मल्लिकार्जुन गुंडप्पण्णावर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी बजावला. लागलीच महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी यांनी बुधवारी सकाळी व्यापारी गाळय़ांच्या पाहणीचा दौरा करून विविध ठिकाणी असलेल्या क्यापारी संकुलाची माहिती घेतली.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे फेरलिलाव करून भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील संकुलाची पाहणी केली. तसेच जुना धारवाड रोड येथील मोडका बाजार, शिवबसवनगर येथील स्मार्ट रोड बांधलेले व्यापारी गाळे, नेहरू नगर आणि महातेंशनगर तसेच विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुले आणि गाळय़ांची पाहणी केली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावरील इमारतीला गळती लागली आहे. ठिकठिकाणी गळती लागल्याने गाळय़ांमध्ये पावसाचे पाणी येत आहे. तसेच इमारतीच्या भिंतींचा व छताचा गिलावा कोसळत असल्याने गाळेधारकांना धोका निर्माण झाला आहे. याची दुरुस्ती करावी, अशी मागणी महापालिकेकडे केली होती.
निधीअभावी दुरूस्तीचे काम रखडले
दुरूस्तीकरिता प्रस्ताव तयार केला होता. पण निधी अभावी दुरूस्तीचे काम मार्गी लागले नाही. पण काम करण्याकरिता गाळे रिकामी करण्याची गरज आहे. त्यामुळे पाहणीवेळी आयुक्तांनी गाळे धारकांशी चर्चा करून दुरूस्तीसाठी गाळे रिकामी करण्याची मागणी केली. गाळे रिकामी करून देण्याची तयारी गाळेधारकांनी केली आहे. व्यापारी संकुलाची पाहणी करून अधिकाऱयांना विविध सूचना आयुक्तांनी केल्या. तसेच जुना धारवाड मोडका बाजार येथील गाळेधारकांशी चर्चा केली. बहुतांश गाळेधारकांनी भाडे भरले नसल्याने रक्कम थकली आहे. त्यामुळे भाडे जमा करा अन्यथा गाळे रिकामी करा. गाळय़ांचे बांधकाम करून देण्यात येईल असे सागितले. पण बांधकाम केल्यास भाडय़ाची रक्कम वाढण्याची शक्मयता असल्याने नवीन इमारत नको अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली. पाहणीवेळी मार्केट निरीक्षक मलिकार्जून गुंडप्पण्णावर, व्यवस्थापक फारूक यड्रावी, महसुल निरिक्षक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.