ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग करण्यात आले आहे. मनसेमध्ये अमित ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. युवा पीढीशी संबंधित जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, अमित ठाकरे यांच्यावर सक्रीय जबाबदारी असेल. पण अंतिम निर्णय राज ठाकरे यांचा असेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, अमित ठाकरे यांनी याआधी मनसेच्या काही आंदोलनात सहभाग घेतला होता. नवी मुंबईत महापालिका कर्मचाऱयांच्या रखडलेल्या मागण्यांविरोधात थाळीनाद मोर्चा मनसेने काढला होता. या मोर्चाचे नेतृत्त्व अमित ठाकरे यांनी केले होते. तसेच राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभांना अमित ठाकरे आवर्जुन उपस्थित असतात. मात्र, व्यासपीठावरुन त्यांना सक्रियपणे भाषण केलेले नाही. त्यामुळे आजच्या मनसे अधिवेशनात अमित ठाकरे व्यासपीठावर बोलणा का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.