ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण 24 परागना मधील सतगछिया मधील तृणमूल काँग्रेसच्या आमदार सोनाली गुहा या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
टीएमसीकडून सोनाली गुहा यांना यावेळी तिकीट मिळालेले नाही आहे. आपल्याला तिकीट मिळाले नसल्याचे कळताच सोनाली गुहा या जोरजोरात रडायला लागल्या होत्या. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, मी सुरुवाती पासूनच ममता बॅनर्जी यांचे समर्थन केले आहे. पण मला खरच माहित नाही की, दीदींनी असा निर्णय का घेतला? दरम्यान, सोनाली गुहा या एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या खूप जवळच्या साथीदारांपैकी एक होत्या.