डिचोली / प्रतिनिधी
मये मतदारसंघातून काँग्रेस गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार संतोषकुमार सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यखंकडे सादर केला. यावेळी त्यांच्या समवेत संघटनमंत्री दुर्गादास कामत, गटाध्यक्ष आनंद पार्सेकर, अँड. विशाल मातोणकर व इतरांची उपस्थिती होती.
मये मतदारसंघात यावेळी बदल हा निश्चित असून मतदारसंघातील लोक फसव्या आश्वासनांना कंटाळले आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाने आपला जाहिरनामा लोकांसमोर ठेवला असून निवडून आल्यानंतर तो चालीस लावताना मतदारसंघाचा कायापालट केला जाणार आहे. तसेच सर्व पंचायतींमध्ये पक्षाचे कार्यालय उघडले जाणार. आणि त्याद्वारे लोकांच्या समस्या लक्षात घेऊन विकास साधला जाणार, असे यावेळी संतोषकुमार सावंत आणि दुर्गादास कामत यांनी सांगितले.