मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे होणार निषेध
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकशाही मार्गाने सीमाभागातील मराठी जनतेने लढा दिला आहे. हा लढा दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तेवढय़ाच ताकदीने सीमाभागातील मराठी जनतेने लढा दिला आहे. यावषी कोरोनाचे कारण पुढे करून दडपशाही करण्यात आली तरीदेखील मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे रविवार दि. 1 नोव्हेंबर काळय़ादिनी मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे मध्यवर्ती म. ए. समितीने स्पष्ट केले आहे.
सकाळी 10.30 ते दुपारी 2 पर्यंत धरणे धरण्यात येणार आहे. मोजक्मयाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे धरणे आंदोलन होणार आहे. प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळत कायद्याच्या चौकटीत हे आंदोलन करायचे आहे. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याने याची दखल घ्यावी, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे. कोरोनामुळे मूक सायकलफेरी तसेच सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता धरणे आंदोलन करून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
सीमाभागातील मराठी जनतेने काळे ध्वज, मास्क आणि दंडाला फिती बांधून हा निषेध नोंदवायचा आहे. कोरोनासारख्या महाभयानक आजारामुळे प्रत्येकाने ही दक्षता घेणे गरजेचे आहे. आमचा लढा सुरूच राहणार, मात्र प्रथम या आजारापासून संरक्षण ही काळाची गरज आहे. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याने संयम राखून निषेध नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.