प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्रीमधील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 537 जवानांचा शपथविधी सोहळा 6 सप्टेंबर रोजी शानदारपणे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल ऑफ द मराठा लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट जनरल असित मिस्त्राr (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएमव्हीएसएम) उपस्थित होते.
जवानांनी त्यांच्यासमोर शिस्तबद्धतेचे दर्शन घडवत त्यांना मानवंदना दिली व नंतर राष्ट्रनिष्ठेची शपथ घेतली. यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल असित मिस्त्राr म्हणाले, भारतीय लष्करामध्ये मराठा लाईट इन्फंट्री ही अत्यंत जुनी व वैभवशाली परंपरा असलेली इन्फंट्री आहे. जवानांनी शिस्त आणि शारीरिक सुदृढता यावर भर दिला पाहिजे. या ठिकाणी दिल्या गेलेल्या प्रशिक्षणाची त्यांनी प्रशंसा केली व जवानांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर उत्कृष्ट जवानासाठी दिले जाणारे एन. के. यशवंत घाडगे व्हिक्टोरीया क्रॉस पदक वैभव दिलीप नांदे यांना देण्यात आले. पाहुण्यांनी शरकत वार स्मृती स्थळाला अभिवादन केल्यानंतर पथसंचलनाला सुरूवात केली.