प्रतिनिधी / बेळगाव
मलाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्स ही भारतात आणि जगात नावाजलेली सोने व्यवहार करणारी शोरुम आहे. अलिकडेच शोरुमने ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ हे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे मलाबारच्या सर्व शोरुममध्ये एकच दर आकारला जातो.
याबाबत मलाबार गुपचे चेअरमन एम. पी. अहमद म्हणाले, आमच्या ग्राहकांना आम्ही वाजवी किमतीचे आश्वासन दिले असून, त्याचे पालन केले जाते. मलाबारच्या व्यवहारात पूर्णत: पारदर्शकता आणायची आहे. एकच दर आकारणीमुळे ग्राहकांना घासाघीस करत वेळ वाया घालवावा लागत नाही. 4.9 टक्क्मयानंतरच्या उत्पादनांवर मलाबार ‘फेअर प्राईस प्रॉमिस’ लागू करत आहे.
मलाबारचे कार्यकारी संचालक ओ. आषर म्हणाले की, मलाबारमध्ये हॉलमार्क केलेले सोने, चाचणी केलेले आणि प्रमाणित उत्पादन हे फेअर प्राईस प्रॉमिसचे वैशिष्टय़ आहे. ग्राहकांना सोने विक्री करताना सुद्धा त्याचा फायदा होतो. विनामूल्य विमा दिला जातो. त्यामुळे ग्राहक मलाबारकडे आकर्षित होत आहेत.