ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती स्वतः किरीट सोमय्या यांनी ट्विट करून दिली आहे.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, पोलिसांनी मला माझ्या निवासस्थाना वरून म्हणजे मुलुंड येथील निलमनगर मधून अटक केली आहे. असं म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घराबाहेर न पडण्याची विनंती केली होती. तरी ही सोमय्या घराबाहेर पडले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी सोमय्या जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी मारहाण केलेल्या, अभियंता असलेल्या अनंत करमुस यांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर सोमय्या यांनी ट्विट केले.