अभिनेत्री जान्हवी कपूर मागील काही दिवसांपासून लोकप्रिय मल्याळी चित्रपट ‘हेलेन’च्या हिंदी रिमेक ‘मिली’वरून चर्चेत आहे. जान्हवीने या चित्रपटाचे मुंबईत चित्रिकरण सुरू केल्याचे समजते. 4 ऑगस्टपासून याचे चित्रिकरण सुरू झाले आहे. जान्हवी या चित्रपटात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पण अद्याप या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची अधिकृत घोषणा झालेली नाही.
जान्हवीने या चित्रपटातील स्वतःच्या व्यक्तिरेखेसाठी तयारी सुरू केली होती. ‘मिली’ हा चित्रपट जान्हवीचे वडिल बोनी कपूर हे झी स्टुडिओसोबत मिळून तयार करत आहेत. या चित्रपटात मनोज पाहवा आणि सनी कौशल देखील मुख्य भूमिकेत दिसून येतील. 15 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित ‘हेलेन’ एक यशस्वी मल्याळी चित्रपट आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. जान्हवी सध्या अनेक चित्रपटांच्या चित्रिकरणात सामील आहे.