प्रतिनिधी / मालवण
आंगणेवाडी यात्रोत्सवानिमित्त मसुरे देऊळवाडा धरण प्रकल्पांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले, “मला आज कोकणात येता आले नाही त्यामुळे मी बेचैन आहे. कोकणवर माझे प्रेम आहे त्यामुळे मी केवळ लोकप्रिय घोषणा करणार नाही. कोकण संपन्न झालाच पाहिजे” असे ते म्हणाले.
आजच्या भराडी देवीच्या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी भराडी मातेकडे कोरोनाचे संकट दूर कर असे गा-हाणे देखील मांडले.