अल निनो पॅक्टरचा परिणाम शक्य : आरबीआय गव्हर्नरांचा इशारा
मुंबई / वृत्तसंस्था
एप्रिल महिन्यात किरकोळ चलनवाढ 4.70 टक्क्यांच्या 18 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली असली तरी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पुन्हा महागाईविरोधात इशारा दिला आहे. चलनवाढीविरुद्धचे युद्ध अद्याप संपलेले नसून मध्यवर्ती बँक अल निनो घटकावर लक्ष ठेवून असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य आरबीआय गव्हर्नर दास यांनी नुकतेच केले. या घटकाचा परिणाम महागाईवर होण्याचे संकेतही त्यांनी दिले. सध्याची परिस्थिती अतिशय गतिमान असून महागाईविऊद्धचे युद्ध अद्याप संपलेले नाही. अशा परिस्थितीत आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. आत्मसंतुष्ट होण्याचे कोणतेही कारण नाही, असे ते पुढे म्हणाले.
मान्सून विभागाने यंदा सामान्य पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. यावषी एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन घटू शकते. अमेरिकेशी संबंधित असलेल्या संस्थेने जून ते डिसेंबर 2023 दरम्यान अल निनोचे आगमन होण्याची शक्मयता वर्तवली आहे. याचा भारतातील मान्सूनवर परिणाम होऊ शकतो.
जानेवारी महिन्यासाठी वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या मासिक आर्थिक आढाव्यात हवामानाशी संबंधित एजन्सींच्या अंदाजाचा हवाला देऊन भारतात अल निनोसारखी परिस्थिती दिसण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. हा अंदाज खरा ठरला तर पाऊस कमी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे कृषी उत्पादन कमी राहू शकते, त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात. अल निनो म्हणजे प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वेळोवेळी होणाऱ्या बदलांचा परिणाम हवामानावर दिसून येतो.