घाऊक महागाई दर 27 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर ः सर्वसामान्यांच्या खिशावर ताण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एकीकडे पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडत असताना घाऊक महागाई दरामध्येही (डब्ल्यूपीआय) वाढ झाल्याचे समोर आले आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाईच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये घाऊक महागाई दर (डब्ल्यूपीआय) 4.17 टक्के इतका झाला आहे. आताचा हा आकडा पुन्हा मागील 27 महिन्यांतील विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. जानेवारी 2021 मध्ये घाऊक महागाईचा दर 2.03 टक्के होता. मात्र, फेब्रुवारीमध्ये त्यात दुपटीपेक्षाही अधिक वाढ होऊन 4.17 टक्क्मयांपेक्षा जास्त झाला आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर आणि खाद्यान्न वस्तूंच्या दरवाढीमुळे हा आगडोंब उसळला आहे.
वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सोमवारी फेब्रुवारी महिन्यात होलसेल चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली. फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाईचा दर मागील 27 महिन्यांच्या (4.17 टक्के) विक्रमी पातळीवर आहे. गेल्या वषी फेब्रुवारीमध्ये हा दर 2.26 टक्के होता. अन्नधान्य उत्पादनांचा घाऊक महागाई निर्देशांक फेब्रुवारीमध्ये 1.36 टक्के इतका झाला आहे. त्याचबरोबर भाज्यांचा घाऊक महागाई दर -20.82 टक्क्मयांवरून -2.90 टक्क्मयांपर्यंत वाढला आहे. त्याचबरोबर कडधान्यांच्या किंमती 10.25 तर फळांच्या किंमती 9.48 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
फेब्रुवारीमध्ये इंधन आणि वीजनिर्मित उत्पादनांच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात -4.78 टक्क्यांवर असलेला इंधन आणि ऊर्जा डब्ल्यूपीआय निर्देशांकात फेबुवारीमध्ये 0.58 टक्क्मयांपर्यंत वाढला आहे. उत्पादित उत्पादनांची घाऊक किंमतही फेब्रुवारीमध्ये 8.81 टक्क्मयांवर पोहोचली आहे. यापूर्वीच्या जानेवारी महिन्यात हा दर 5.13 टक्के इतका होता.
किरकोळ महागाई दरातही वाढ
फेब्रुवारीमध्ये किरकोळ चलनवाढीचा दरही 5.03 टक्क्मयांवर गेला. गेल्या आठवडय़ात शुक्रवारी किरकोळ महागाईबाबत केंद्र सरकारने आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार जानेवारीत ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) वर आधारित किरकोळ चलनवाढीचा दर 4.06 टक्के होता. फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण एक टक्क्याने वाढून 5.03 टक्क्मयांवर गेले आहे.
मागील दोन महिन्यांपासून सामान्य जनतेला महागाईचा फटका बसताना दिसत आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वर चढत असताना दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती देखील वाढल्या होत्या. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 825 रुपयांवर पोग्नेहोचली होती. तर आता खाद्यतेलाच्या किंमतीत देखील वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.
खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी वाढ
कच्च्या मालाचा तुटवडा, आयातीवरचा वाढत असलेला खर्च आणि त्यात इंधन दरवाढीमुळे भारतात खाद्य तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल 25 टक्क्यांनी खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. नजिकच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे गृहिणींना याचा आणखी मोठा फटका बसणार आहे.