विसर्जन सुरू असतानाही रस्त्याची दुरुस्ती सुरूच
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका गणेशभक्तांना विसर्जना दरम्यान बसला. एकीकडे सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू असताना दुसरीकडे मात्र पेव्हर्स बसविण्याचे काम सुरू होते. यामुळे कपिलेश्वर विसर्जन तलावाकडे जाणाऱया गणेशभक्तांना याचा फटका बसला. रस्ता खराब झाला हे माहिती असतानाही विसर्जन कालावधीतच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यामुळे नेहमीप्रमाणे यावेळीही मनपाचे वरातीमागूनच घोडे हे चित्र पुन्हा एकदा दिसले.
कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या खालील बाजूस एसपीएम रोडवर मागील अनेक दिवसांपासून खड्डा पडला होता. या ठिकाणी रस्त्याची धूळधाण झाली होती. मागील आठवडय़ात झालेल्या पावसामुळे या खड्डय़ाला डबक्मयाचे स्वरुप प्राप्त झाले होते. तरीदेखील महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसांपूर्वी या डबक्मयात बारीक खडी आणून टाकण्यात आली. परंतु विसर्जनावेळी या खराब रस्त्यामुळे गणेशभक्तांना फटका बसू शकतो, याची आठवण मात्र उशिरा झाली.
शनिवारी रात्री या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात पेव्हर्स बसविण्यात आले. त्यावर टाकण्यात आलेली खडी रविवारी सकाळी 11 पर्यंत तशीच होती. रविवारी अनंत चतुर्दशी असल्याने सकाळपासूनच घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. परंतु पेव्हर्स बसविण्यात आल्यानंतर टाकण्यात आलेली खडी काढण्यात आली नव्हती. महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी ही खडी बाजूला केली. परंतु ये-जा करणाऱया गणेशभक्तांना या कामाचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे यापुढे तरी मनपाने पूर्ण नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.