प्रतिनिधी / सांगली
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका आणि पर्यावरण संरक्षण गतविधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका क्षेत्रात पंचतारांकित घर अभियान राबविण्यात आहे. पंचतारांकित घराचा दर्जा प्राप्त करणाऱ्या घराना मालमत्तेच्या सामान्य करात सवलत देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.
घरातील कचरा घरातच म्हणजे कंपोस्टिंग करणे, कमीत कमी उर्जावापर, पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर, पक्षांसाठी निवारा, ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे असे या पंचतारांकित घर अभियानाचे स्वरूप असल्याचे डॉ. ताटे यांनी सांगितले.