प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर विविध योजना राबविण्यात येतात. याकरिता निधीची तरतूद करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाल्याने योजनांचा कृती आराखडा अद्याप तयार करण्यात आला नाही. यामुळे योजना राबविण्यास विलंब होण्याची शक्मयता आहे.
दरवषी महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये मंजूर करून शासनाकडे पाठविला जातो. मार्च महिन्यात विविध योजना राबविण्याकरिता शासनाकडून निधीची तरतूद करण्यात येते. मात्र यंदा अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणू नियंत्रणाच्या कामात व्यस्त होते. यामुळे अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर ठराव करून शासनाकडे पाठविण्याचे काम रखडले आहे.
2020-21 या वर्षीच्या अर्थसंकल्पात विविध योजनांकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण शासनाकडून मंजुरी मिळाली नसल्याने योजना राबविण्याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आला नाही. शासनाकडून मिळणाऱया निधीमधून मागासवर्गीय, अपंग, अल्पसंख्याक आणि सामान्यवर्गासाठी निधी राखीव ठेवण्यात येतो. मागासवर्गियांसाठी 29 टक्के, अल्पसंख्याकांकरिता 7.25 टक्के आणि अपंगांकरिता 3 टक्के अनुदान राखीव ठेवण्यात येते. त्या अनुदानामधून स्वयंरोजगार, नळयोजना, ड्रेनेज जोडणी आदी विविध योजना राबविण्यात येतात. पण सध्या कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने योजना राबविण्याकरिता कोणताच आराखडा तयार करण्यात आला नाही.
दरवषी कृती आराखडा तयार करून योजना राबविण्याकरिता अर्ज मागविण्यात येतात. पण सध्या कृती आराखडा तयार नसल्याने अर्ज मागविण्याची प्रक्रिया लांबणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.