वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र
कोरोना विषाणूच्या संकटामुळे जागतिक पर्यटन उद्योग संपूर्णपणे अडचणीत आला असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राचे महासचिव एटोनियो गुडारेस यांनी दिली आहे. सध्या सुरु असणाऱया कोरोना महामारीमुळे पर्यटन उद्योगाने चालू वर्षातील पाच महिन्यात जवळपास 320 अब्ज डॉलर्सचे नुकसान झेलल्याची नेंद केली आहे.
सदरच्या नुकसानीमुळे पर्यटन उद्योगामधील 12 कोटी रोजगार धोक्मयात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्राचा जागतिक अर्थव्यवस्थेतला वाटा मोठा आहे. हे सर्वात मोठय़ा तिसऱया क्रमांकाचे निर्यात क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
जागतिक व्यापारात पर्यटन क्षेत्राचा हिस्सा हा 2019 मध्ये सात टक्क्मयांवर राहिला होता. संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीवर प्रत्येक 10 मधील एका व्यक्तिला हे क्षेत्र रोजगार प्राप्त करुन देत आले आहे.
अर्थव्यवस्थेला चालना देणारे क्षेत्र
पर्यटन क्षेत्र हे अर्थव्यवस्थेला चालना देणारे एक महत्त्वाचे क्षेत्र ठरले आहे. विविध देशातील संस्कृतींचा परिचय पर्यटनाच्या माध्यमातून अनेकांना होत असतो. विमानांमुळे तर आज अनेकजण लांबवरची ठिकाणे पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने जात असतात. यातून पर्यटनाला वाव मिळतो, उत्पन्न वाढीला निश्चित दिशा मिळते.