ऐन हंगामात बैल गमावल्याने शेतकरी हवालदिल
ओटवणे / प्रतिनिधी :
मुंबई-गोवा महामार्ग झाराप-पत्रादेवी बायपासवर मळगाव येथील स्वामी धाबा नजिकच्या सर्कल लगत रस्त्यावर अचानकपणे
आलेल्या बैलाला इनोव्हा कारची धडक बसल्याने मळगाव सुतारवाडी येथील देवानंद मेस्त्री यांच्या मालकीचा हा बैल जागीच गतप्राण झाला. या अपघातात इनोव्हा कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. ही कार बांदा येथून वेंगुर्ला येथे जात होती.
कार चालकाने बायपासवर अचानक आलेल्या बैलाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र धडक एवढी जोरदार बसली की बैल जागीच मृत्यू पावला. होता. ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी देवानंद मेस्त्री यांना धक्काच बसला.