प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकचे अधिवेशन बेळगावमध्ये भरविले जात असून, याला मराठी भाषिकांचा विरोध आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी सोमवार दि. 13 रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. व्हॅक्सिन डेपो येथे होणाऱया महामेळाव्याला युवा समितीने जाहीर पाठिंबा दिला असून, मराठी भाषिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने करण्यात आले.
रविवारी जत्तीमठ येथे युवा समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डेक्कन हेरॉल्ड या वृत्तपत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचा करण्यात आलेला अवमानकारक लेखनाचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच महामेळाव्याच्या नियोजनाविषयी कार्यकर्त्यांनी चर्चा केली.
या बैठकीला अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, किरण मोदगेकर, सिद्धार्थ चौगुले, साईनाथ शिरोडकर, भावेश बिर्जे, प्रवीण रेडेकर, आकाश भेकणे, राकेश सावंत, निखील देसाई, जोतिबा चौगुले, सतीश जुटेकर, आशिष कोचेरी, अजय सुतार, सुधीर शिरोळे, अभिजित मजुकर, भागोजी पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवाजीनगर येथे महामेळाव्यासाठी जागृती
म. ए. समितीच्यावतीने सोमवार दि. 13 रोजी होणाऱया महामेळाव्याला शिवाजीनगर येथून मोठय़ा संख्येने मराठी भाषिक सहभागी होतील, असा निर्धार आयोजित बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शिवाजी मंडोळकर होते.
बैठकीला युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, सूरज कणबरकर, श्रीकांत कदम, विनायक वर्पे, किरण मोदगेकर, श्रीकांत शितोळे, अनुप किल्लेकर, विनायक बावडेकर, राहुल लोहार, अनिकेत जाधव, चारूदत्त केळकर, महेश तरळेकर, संतोष निकम, हरिष पाटील, हृतिक सूर्यवंशी, पांडू पाटील, करण धामणेकर, आकाश पत्तार, पिंटू पाटील, प्रवीण रेडेकर, राजू कदम, आकाश भेकणे यांच्यासह इतर उपस्थित होते.
महामेळाव्यात शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी होणार
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवार दि. 13 रोजी म. ए. समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये बेळगाव शहर व तालुक्मयातून मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी होतील, असा निर्धार शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी होते.
या बैठकीला उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहरप्रमुख प्रवीण तेजम, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, दत्ता जाधव, चंद्रकांत कोंडूसकर, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, तानाजी पावशे, पिराजी शिंदे, विनायक जाधव, प्रदीप सुतार, राजू कणेरी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
आजवर सीमाप्रश्नाच्या आंदोलनात महिला अग्रणी राहिल्या आहेत. त्यामुळे जोवर मराठी भाषिकांना न्याय मिळत नाही, तोवर प्रत्येक आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार महिला आघाडीने केला. सोमवारी होणाऱया महामेळाव्याला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, सचिव व माजी महापौर सरीता पाटील यांनी केले आहे.