ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या घट होताना दिसत आहे. राज्यात मागील 24 तासात 15 हजार 077 नवीन कोरोनाबाधित आढळले असून, 184 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 33,000 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 53 लाख 95 हजार 370 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.88 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.66 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,50,55,054 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,46,892 (16.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 18,70, 304 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 10,743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 2 लाख 53 हजार 367 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ 433 दिवसांवर
मुंबईत मागील 24 तासात 5,570 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 29 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,06, 251 वर पोहचली असून त्यातील 6,66,796 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 22,390 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 14,884 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.