ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा फैलाव रोकण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस झटणाऱ्या महाराष्ट्रातील 64 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. आणि हे सर्वच्या सर्व पोलीस कर्मचारी मुंबई मधील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या 64 कर्मचाऱ्यांमध्ये 12 अधिकारी आणि 52 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे.
दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारच्या वर पोहचली आहे. संपूर्ण देशातील कोरोना बाधीतच्या संख्येत सर्वात जास्त आकडा मुंबईचा सर्वाधिक आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात 3 हजार 451 जणांना कोरोनाची लागण झाली असून आत्तापर्यंत 151 जणांना आपला जीव गमावला आहे.