- शुक्रवारी 63,729 नव्या रुग्णांची नोंद; 398 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान, काल पुन्हा एकदा उच्चांकी रुग्ण वाढ झालेली दिसून आली.
मागील 24 तासात 63,729 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गुरूवारी ही संख्या 61 हजार 695 इतकी होती. तर बुधवारी 398 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील बाधितांची एकूण संख्या 37 लाख 03 हजार 584 वर पोहोचली आहे.
- सक्रिय रुग्णांनी ओलांडला 6.38 लाखांचा टप्पा!
कालच्या एका दिवसात 45,335 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 30 लाख 04 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.61% इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 38 हजार 034 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 33 लाख 08 हजार 878 नमुन्यांपैकी 15.89 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 35 लाख 14 हजार 181 क्वारंटाईनमध्ये असून, 25 हजार 168 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.