ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात शनिवारी सर्वाधिक 7074 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 064 वर पोहचली असून, मृतांचा एकूण आकडा 8671 एवढा आहे.
शनिवारी दिवसभरात 3395 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 1 लाख 08 हजार 82 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 83 हजार 295 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 295 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर 4.33% आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.02 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 10 लाख 80 हजार 975 नमुन्यांपैकी 2 लाख 64 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 96 हजार 038 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 41 हजार 566 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.