ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी जास्त प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहेत. मागील 24 तासात 8 हजार 470 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर 9 हजार 043 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.09%
दरम्यान, कालच्या दिवशी 188 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.98 % इतके आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 57 लाख 42 हजार 258 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 95.09 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 1,23, 340 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
- 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होमक्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 98 लाख 86 हजार 554 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59 लाख 87 हजार 521 (15.1%) रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 58 हजार 863 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 4 हजार 196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
- उच्चांकी लसीकरण !
दरम्यान, राज्यात कालपासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यातील 5 लाख 52 हजार 909 जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.