ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 98 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 25 हजार 232 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या एकूण 25,232 कोरोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत 22 हजार 917 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- 2,052 पोलिसांवर उपचार सुरू
सद्यस्थितीत राज्यात 2,052 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 263 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.