ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 12,614 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 322 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 84 हजार 754 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 19 हजार 749 एवढा आहे.
शनिवारी दिवसभरात 6 हजार 844 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 4 लाख 08 हजार 286 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 56 हजार 409 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 69.82 % आहे. तर मृत्यू दर 3.38 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 31 लाख 11 हजार 514 नमुन्यांपैकी 5 लाख 84 हजार 754 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10 लाख 44 हजार 974 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 524 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.