ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मंगळवारी 2287 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 72 हजार 300 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 2362 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली.
मंगळवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 1225 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 31 हजार 333 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 38 हजार 493 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 103 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43.33 % आहे. तर मृत्यू दर 3.4 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 4 लाख 83 हजार 875 नमुन्यांपैकी 4 लाख 11 हजार 575 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 72 हजार 300 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 70 हजार 453 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 097 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.