ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात बुधवारी 3307 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 16 हजार 752 वर पोहचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
बुधवारी दिवसभरात 1315 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 59 हजार 166 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 51 हजार 921 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 114 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 88 पुरुष आणि 26 महिला रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 5651 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 7 लाख 954 नमुन्यांपैकी 1 लाख 16 हजार 752 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 82 हजार 699 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 27 हजार 582 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.