मालवण/प्रतिनिधी –
महाराष्ट्र सरकारने आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये अर्थमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या वेगवेगळ्या घोषणा केल्या त्यामध्ये प्राधान्याने महाराष्ट्रातील युवकांना स्टास्टार्टअप कडे प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक महसूल विभागांमध्ये अत्याधुनिक इंक्युबेशन सेंटर करण्याची घोषणा केली व त्याकरीता पाचशे कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली व कौशल्य विकासासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद या दोन्ही तरतुदी युवकांना व्यापार उद्योग करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या आहेत. स्टार्टअपला लागणाऱ्या बीज भांडवलासाठी राज्य सरकारनं सुरुवातीच्या टप्प्यात शंभर कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्याची घोषणा केली आहे, याचेही महाराष्ट्र चेंबरतर्फे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत केले आहे.